बीएसआय न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम (एनआयपी) च्या यशस्वी एक वर्षानंतर बालकांमधील कुपोषणाच्या प्रमाणात ७.४ टक्क्यांची घट
- बीएसआय एनआयपी ने वाचवले महाराष्ट्रातील अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यांत असलेल्या ०-५ वर्ष वयोगटातील ६५०० बालकांचे प्राण
- स्वतंत्र संस्था सस्टेनेबल स्क्वेअर च्या अभ्यासानुसार बीएसआय न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम मध्ये गुंतवलेल्या १ रूपयातून मिळते ३६.९० रूपयांचे सामाजिक मुल्य
- सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून १ लाख ७७ माता आणि बालकांच्या सहभागातून पुढील चार वर्षांत अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाच्या विरोधात लढा देणार
न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम द्वारे एका वर्षांत केलेला सार्वजनिक आरोग्यावरील परिणाम |
Ø मुलांमध्ये योग्य वेळेत योग्य आहार देण्याच्या पध्दतीत ७१ टक्के वाढ
Ø अति-कुपोषित बालकांच्या प्रमाणात ७.४ टक्क्यांची घट Ø संपूर्ण ॲन्टे नॅटल कव्हरेज च्या तुलनेत गरोदर महिलां मध्ये ७ टक्के वाढ Ø गरोदर महिलांच्या ॲनिमिया मध्ये २३ टक्क्यांची घट Ø सार्वजनिक क्षेत्रातील बाळंतपणाच्या सुविधांमध्ये ५९ टक्के वाढ Ø लहान बालकांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याच्या दरात ५६ टक्के घट Ø जन्मानंतरच्या एका तासात स्तनपान देण्याच्या प्रमाणात ३७ टक्के वाढ Ø ११.६ टक्के स्तनदा मातांच्या खाद्यात वैविध्य आणण्यात यश |
भारत, २० ऑगस्ट २०२०- डेटॉल बीएसआय-न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम च्या पहिल्या वर्षी यशस्वी आयोजन केल्यानंतर असे दिसून आले आहे की महाराष्ट्र राज्यातील अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या कुपोषणात ७.४ टक्के घट दिसून आली. पहिल्या १० महिन्यांच्या कालावधीत कार्यक्रमाच्या माध्यमातून ४१ कम्युनिटी न्युट्रिशन वर्कर्सच्या मदतीने १-५ वर्षांतील जवळजवळ ६५०० मुलांचा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. सस्टेनेबल स्क्वेअर या स्वतंत्र संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे की बीएसआय न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम मध्ये १ रूपयांची गुंतवणूक केल्यास त्याचे सामाजिक मुल्य हे रू ३६.९० इतके मिळते.
पाच वर्ष चालणार्या या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून या अंतर्गत बालकांच्या पहिल्या १००० दिवसां मध्ये त्यांना मदत केली जाते. महाराष्ट्रातील अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यातील गरोदर महिला आणि बालकांच्या पोषणाचा तसेच स्वच्छतेचे प्रमाण यांचा अभ्यास करण्यासाठी डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स वर आधारीत नाविन्यपूर्ण मॉड्यूल्स चा उपयोग केला जातो.
या भागिदारी विषयी माहिती देतांना रेकिट बेनकिसर हेल्थ च्या दक्षिण एशिया विभागाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट गौरव जैन यांनी सांगितले “ समाजात मोठे बदल घडवण्यासाठी पोषण आणि स्वच्छता हे दोन घटक महत्त्वपूर्ण असतात आणि यातून महिला आणि मुलांचे सक्षमीकरण करणे शक्य असते. महाराष्ट्रातील अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यांतील कुपोषणाचे वाढते आकडे पाहून आम्ही आमचा न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम हा प्लॅन इंडिया च्या सहकार्याने सुरू केला. पाच वर्ष चालणार्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत गरोदर महिला आणि बालकांच्या आरोग्य, स्वच्छता आणि पोषण या गोष्टी बळकट करण्यावर जोर देण्यात येणार आहे.”
आपल्या सहकार्या विषयी माहिती देतांना प्लॅन इंडियाचे कार्यकारी संचालक मुहम्मद आसिफ यांनी सांगितले “ ग्रामीण भागातील कुपोषण आणि पोषण यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी सरकार, कॉर्पोरेट्स आणि सामाजिक संस्था यांची कशी भागिदारी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम होय. या कार्यक्रमातून जे शिकायला मिळत आहे त्यांचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर रेकिट बेनकिसर आणि त्यांच्या भागिदारांनी मोठ्या प्रमाणार राष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक आरोग्य विषयक कार्यक्रम हाती घेऊन कोविड-१९ च्या साथीतही मोठे प्रयत्न केले आहेत.”
ते पुढे म्हणाले “ या भागिदारीसाठी आम्ही आरबी चे आभार मानतो व त्यांनी गरीब समाजाच्या सार्वजनिक आरोग्य आणि पोषणासाठी वेळेवर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या बद्दल ही त्यांचे आभार मानतो.”
गेल्या वर्षभरापासून न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम ने समाजात काम करून ट्रॅव्हलिंग न्युट्रिशियन चॅम्पियन्स चा विकास केला असून ते ‘कम्युनिटी न्युट्रिशन वर्कर्स (सीएनडब्ल्यूज) या नावाने ओळखले जातात. या वर्कर्स ना सार्वजनिक आरोग्य तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ञ आणि सामाजिक विकास तज्ञांकडून अतिशय कठीण असे प्रशिक्षण दिले जाते व त्यांना चांगल्या पोषणाच्या गोल्डन रूल्सबाबत प्रशिक्षित करण्यात येते.
सध्या सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून माता आणि बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. कम्युनिटी न्युट्रिशन वर्कर्स ना या कार्याशी संबंधित सर्व गोष्टींचे ज्ञान देण्यात येत असून यांत गरोदरपणात मातांनी घ्यायची काळजी, त्यांनी त्यांच्या जेवणात कसला समावेश करावा, स्तनपानाचे प्रशिक्षण, बाळंत झाल्यावरच्या एका तासातील स्तनपानाचे महत्त्व, नवजात अर्भकासाठी स्तनपान तसेच बाळामध्ये कुपोषणाची लक्षणे दिसून आल्यास बाळाला कोणत्या प्रकारचा आहार द्यावा याबद्दलची माहिती यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या पुढील चार वर्षांच्या कालावधीत १ हजार गावांमधील १ लाख ७७ हजार कुपोषित महिला आणि बालकांपर्यंत पोहोचून पाच वर्षांखालील मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण हे ४० टक्के कमी केल्यामुळे त्या बालकांना बालपणाचा आनंद घेण्याचा वेळ ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
संपूर्ण भारतीय स्तरावर पाहता समाजाला मदत करण्याचे कौशल्य हे पध्दतशीर प्रक्रियेने पूर्ण करणे शक्य आहे. भागिदार संस्था सुध्दा न्युट्रिशन वर्कर्स ना सोप्या आणि संभाषणात्मक उपकरणांचा वापर करू देत असल्याने पोषण आणि स्वच्छते विषयी जागरूकता निर्माण होऊन समजात बदल घडणे शक्य आहे. प्लॅन इंडिया विषयी जाणून घेण्यासाठी येथे www.planindia.org लॉगइन करा.
संपादकां करता सुचना –
सामाजिक गुंतवणूकीतून होणारा लाभ म्हणजे केलेल्या खर्चातून समाजाला होणारा तुलनात्मक फायदा. हे लाभ म्हणजे सध्याच्या नेट प्रेझेंट व्हॅल्यू आणि सध्याच्या गुंतवणूकीचे मुल्य यांचे गुणोत्तर होय. एकूण सार्वजनिक आरोग्यावरील परिणाम हा साधारण ५ लाख जनतेतून मोजला जातो.
About RB:
RB* is driven by its purpose to protect, heal and nurture in a relentless pursuit of a cleaner, healthier world. We fight to make access to the highest-quality hygiene, wellness and nourishment a right, not a privilege, for everyone.RB is proud to have a stable of trusted household brands found in households in more than 190 countries. These include Enfamil, Nutramigen, Nurofen, Strepsils, Gaviscon, Mucinex, Durex, Scholl, Clearasil, Lysol, Dettol, Veet, Harpic, Cillit Bang, Mortein, Finish, Vanish, Calgon, Woolite, Air Wick and more. 20 million RB products a day are bought by consumers globally.RB’s passion to put consumers and people first, to seek out new opportunities, to strive for excellence in all that we do, and to build shared success with all our partners, while doing the right thing, always is what guides the work of our 40,000+ diverse and talented colleagues worldwide. For more information visit https://www.rb.com/